📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिवस

( मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा दिवस गौरव दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी काकाणी वाचनालयाचे अध्यक्ष श्री अजय शहा हे प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी मराठी साहित्यात कुसुमाग्रजांचे महत्त्वपूर्ण योगदान, त्यांचे साहित्य याबरोबरच मराठी भाषेचे महत्व याबद्दल विस्तृत माहिती दिली. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आपले आवडते क्षेत्र निवडताना मराठी भाषेचा बहुमोल उपयोग कशाप्रकारे होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. मराठी भाषा शिकणे का आवश्यक आहे याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ फर्जाना यांनी केले प्रा सुनेत्रा मेश्रामकर यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी , प्रा. मुनव्वर अहमद यांच्या सह अनेक विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने