ब्राम्हणगांव : - ता.सटाणा दि.२३
येथील मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात संस्थेचे माजी सरचिटणीस ॲड. बाबूराव ठाकरे यांचा स्मृतिदिन व आधुनिक काळातील महान संत गाडगे महाराज जयंती निमित्त शालेय समिती सदस्य मा.श्री संजय जाधव,प्राचार्य मा.श्री बी.जे.बच्छाव,पर्यवेक्षिका श्रीम.एम.बी.सोनवणे व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कुमारी वैष्णवी महेंद्र अहिरे या विद्याथीनींने ॲड.बाबुराव ठाकरे व संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्या विषयी सविस्तर माहिती
दिली.
महाराष्ट्र राज्यातील एक किर्तनकार व थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांचे जीवन कार्य तसेच संस्थेचे माजी सरचिटणीस ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या जिवनकार्या विषयी माहिती श्री यु.एन.खरे व श्री जे.एच. पाकळे यांनी दिली .
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सरचिटणीस व अध्यक्ष ॲड बाबूराव ठाकरे यांची ग्रामिण भागातील शिक्षणाविषयीची तळमळ त्यांच्या कार्यातून दिसुन येते. असे प्रतिपादन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्री.एम.बी.सोनवणे यांनी केले.
समाजेचे आपण काही देणे लागतो. या भावनेने मविप्र समाजाच्या माध्यमातून ग्रामिण भागात शिक्षणाचे जाळे निर्माण करण्यासाठी ॲड बाबूराव ठाकरे यांनी अपार मेहनत करून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच आधुनिक काळातील महान संत गाडगेमहाराज यांच्या जीवन कार्या विषयी सविस्तर माहिती विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री बी.जे.बच्छाव यांनी विशेद केली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पूर्वा विलास सोनवणे व मोक्षदा नितीन शिरोडे यांनी केले.आभार प्रदर्शन वैष्णवी महेंद्र अहिरे हिने केले .
याप्रसंगी शालेय समिती सदस्य मा.श्री संजय जाधव, दैनिक सकाळ मालेगाव वितरण विभागाचे जलिल शेख सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.