📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अहिरे विद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचे मूल्य जपणारे विचार आत्मसात करा - किशोर अहिरे
(प्रतिनिधी - दिनेश पगारे) सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव
येथील मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल,अभिनव बाल विकास मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय ब्राह्मणगाव विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.श्री अतुल (नाना) नरेंद्र अहिरे यांनी भुषविले.मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. *जय जय महाराष्ट्र माझा* या राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
      विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री बी.जे. बच्छाव यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्या विषयी आपल्या प्रास्ताविकेतून माहिती दिली.
    कुमारी येता चव्हाण,गौरी हयाळीज,फाल्गुनी अहिरे,वैभवी अहिरे,नंदिनी परदेशी,कुमार शिव अहिरे,विवेक अहिरे या विद्यार्थ्यांनी गीत,पोवाडे आणि भाषणाच्या माध्यमातून *एकच राजे शिवराय माझे* या उक्ती प्रमाणे शिवरायांचा इतिहास व कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व केल्याबद्दल मान्यवरांनी रोख स्वरुपात बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहित केले.
         याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व मावळे यांची आकर्षक वेषभुषा करून हातात भगवे झेंडे घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
     *दैवत आपले छत्रपती* या गितावर लेझिम पथकाने सुंदर लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांचे मन आकर्षित केले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती देतांना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले पाहिजे.असे प्रतिपादन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम. एम.बी.सोनवणे यांनी केले.
     राजमाता,मॉ साहेब जिजाऊ ज्यांनी शिवरायाच्या व मावळ्यांच्या माध्यमातून स्वराज्यांची नव्हे. सुराज्याची निर्मिती केली.सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास साथ दिली.माता रमाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या माध्यमातून देशाला महान असे संविधान दिले.अशा सर्व शुरवीर व कार्यक्षम मातांचा आदर्श सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणाचा विचार केला. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचे पालन केले.भवानी मातेची आराधना केली.महिलांना आदराचे स्थान दिले. प्रत्येकाने या गुणांचे अनुकरण केल्यास हिच खरी शिवरायांना दिलेली मानवंदना ठरेल. शिवाजी महाराजांचे मूल्य जपणारे विचार आत्मसात करावे.असे प्रतिपादन उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सन्मा.श्री किशोर( आबा) रामदास अहिरे यांनी केले.
    याप्रसंगी अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीम. हिरुबाई साहेबराव अहिरे,श्री प्रकाश कौतिक अहिरे,श्री निंबा नानाजी अहिरे, श्री विनोद सिताराम अहिरे,श्री अशोक काशिनाथ शिरोडे, श्री अशोक राजाराम देवरे,श्री भास्कर केवळ अहिरे, श्री विश्वनाथ नथु वाघ, श्री सिताराम उखा अहिरे,श्री भावराव वामन अहिरे,श्री नानाजी पांडूरंग अहिरे,श्री सुदाम दादाजी अहिरे,श्री हेमंत पोपट अहिरे,श्री रामराव नामदेव अहिरे,श्री सूर्यकांत भावराव बागुल,श्री माणिक केदा भदाणे,श्री मुरलीधर बळीराम चव्हाण,श्री केशव मानाजी अहिरे,श्री माधव आनंदा पगार,श्री संजय रघुनाथ जाधव,श्रीम.शोभा राजेंद्र अहिरे,श्री राजेंद्र मन्साराम चव्हाण,श्री बहिनाजी धोंडू चव्हाण, श्री नारायण आनंदा अहिरे व पालक वर्ग उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए.एम जगताप यांनी केले.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा श्रीम. एस.आर.पाटील व त्याचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने