📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जाणता राजा मित्र मंडळ व उमराणे ग्रामस्थांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

राकेश आहेर:- (देवळा)

      देवळा तालुक्यातील उमराणे मावळखोऱ्याचे ग्रामदैवत श्री. रामेश्वर महादेव मंदिरात येथील ग्रामहितवादी संघटनेचे अध्यक्ष भगवान देवरे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली.      
   स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे पूजन पं.स. माजी सभापती धर्मा देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे चौकात शिवजयंती उत्सवाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच कमलताई देवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर बाजार समितीचे मा.सभापती विलास देवरे तसेच गावातील प्रमुख मान्यवर व बारा बलुतेदार, अठरापगड बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
        या प्रसंगी उमराणे वाशियांची २४ तास सुख दुखा प्रसंगी मदत करणारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माजी सरपंच सुभाष देवरे, जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी नागपूर ते मुंबई सायकलीने प्रवास करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे सेवानिवृत्त शिक्षक आर.डी.निकम, श्रीलंका येथील विद्यापीठात व्याख्यान देणारे सचिन देवरे यांचा शिवचरित्र भेट देऊन अनुक्रमे जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, प्रकाश पाटील, माजी सभापती राजेंद्र देवरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशांत देवरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच दिलीप देवरे, मोतीराम देवरे, दत्तू देवरे, बाळासाहेब देवरे, सचिन देवरे, सुनील देवरे, संदीप देवरे, नाना रावबा देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
     मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात मंडळाला आज २९ वर्ष पूर्ण झालेली असुन आपणच राजा व आपणच प्रजा ह्या कार्यपद्धतीने मंडळाचे कार्य प्रत्येक क्षेत्रात अखंडपणे सुरु असल्याचे प्रतिपादन केले. जाणता राजा मित्र मंडळाचे कार्य हे छत्रपती शिवरायाच्या राजमुद्रेचा आदर्श घेऊन मंडळाचे कार्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढतच जाणार आहे असे उद्गार प्रशांत देवरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले तसेच विलास देवरे यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सुनील देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने