निरोगी आरोग्यासाठी नियमित सायकलचा वापर करा- दिलीप दळवी
सटाणा ( प्रतिनिधी - दिनेश पगारे) १४
येथील मविप्र शैक्षणिक संस्था नाशिक संचालित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल,अभिनव बाल विकास मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र शासनाच्या मानव संसाधण व विकास मंत्रालय अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाडी वस्तीतून चार ते पाच किलोमिटर अंतरावरून पायी चालत यावे लागते.अशा मुली सामाजिक व आर्थिक कारणांमुळे किंवा शाळेत येण्या जाण्याच्या सुविधांअभावी शिक्षणापासुन वंचित राहु नयेत तसेच शिक्षणाच्या प्रवाहात टिकुन राहवे. त्यांची गळती थांबवी या उद्देशाने विद्यालयातील आठ विद्यार्थिनींना आज मंगळवार दि.१४ रोजी संस्थेचे चिटणीस सन्मा.श्री दिलीप (भावसा ) दळवी व सन्मा.ॲड.श्री आर.के. (आण्णा ) बच्छाव तालुका संचालक मालेगाव यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री बी.जे. बच्छाव यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेतील विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली .
विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात या योजनांचा आणि विविध शासकीय सवलतींचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मविप्रचे चिटणीस आदरणीय श्री दिलीप (भावसा) दळवी यांनी केले.
१०८ वर्षापूर्वी मविप्र या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. एका रोपट्याचे आज भव्य वटवृक्षात रुपांतर झाले. त्या वटवृक्षाच्या छायेखाली ज्ञानार्जनाचे कार्य जोमात सुरू आहे.
*नांगर टाका भाला फेका, शिकवी शिवराया* हि शिकवण शिवरायांनी दिली.आज नांगर टाका, भाला फेका, पेन उघडा, पुस्तक हातात धरा आणि आपली व आपल्या देशाची उन्नती साध्य करा असे म्हणण्याची वेळ आली आहे. शिस्त,पारदर्शकता या त्रि:सूत्रीवर आधारीत शैक्षणिक कार्य करावे. ब्राम्हणगांव हे गुणीजनांचे गाव आहे या गावात गुणीजन निर्माण करावेत असे प्रतिपादन मा. ॲड.आर.के. बच्छाव यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले .
स्वच्छ भारत - समृद्ध भारत या अभियान अंतर्गत श्री भास्कराचार्य प्रतिष्ठाण, औरंगाबाद आणि अक्षय भैया जायभावे जि.प. सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने " स्वच्छ भारत अभियान - २०२२ " अंतर्गत *स्वच्छ सर्वेक्षण* सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री अतुल ( नाना ) नरेंद्र अहिरे, उच्च माध्यामिक शालेय समितीचे अध्यक्ष सन्मा. श्री किशोर ( आबा ) रामदा अहिरे, अभिनव बाल विकास मंदिर शालेय समिती अध्यक्षा सन्मा.श्रीम.हिरुबाई साहेबराव अहिरे सदस्य श्री संदीप मधुकर अहिरे,श्री निंबा नानाजी अहिरे,श्री अशोक भागा अहिरे,श्री अशोक राजाराम देवरे,श्री भावराव वामन अहिरे,श्री रामराव नामदेव अहिरे,श्री केशव मानाजी अहिरे,श्री बहिनाजी धोंडू चव्हाण,जेष्ठ सभासद श्री बबन आप्पा बच्छाव, श्री विश्वास जगन्नाथ खरे,श्री आबाजी त्र्यंबक चव्हाण,श्री अशोक दादा बच्छाव,श्री सागर दळवी,श्री कैलास मालपाणी, श्री राजेंद्र मुरलीधर चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते .