📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लासलगाव येथे भीषण अपघात : टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेने चार कर्मचारी ठार

लासलगाव (राकेश आहेर)  - येथील रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास लाईटच्या दुरुस्त करण्याचे इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने येथे काम करत असलेल्या चार गँगमनचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहितीनुसार, लासलगाव रेल्वे स्थानकावर आज(दि.१३) फेब्रुवारी रोजी पावणेसहाच्या सुमारास लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन चुकीच्या डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. तर किमी २३० व पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटेनचे काम सुरू होते. हे काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी करताना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणाऱ्या टॅावरने धडक दिल्याने त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. यात संतोष भाऊराव केदारे (वय ३८), दिनेश सहादु दराडे (वय ३५), कृष्णा आत्मराम अहिरे (वय४०) ,संतोष सुखदेव शिरसाठ (वय ३८ वर्षे) यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने