📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तुर्की सीरिया भुकंपग्रस्त बळींना भावपूर्ण श्रद्धांजली

ब्राम्हणगांव : - ता सटाणा दि. ११
हे विश्वची माझे घर या उक्ती प्रमाणे मविप्र समाज शैक्षणिक संस्था नाशिक संचलित श्रीराम सजन अहिरे नूतन इंग्लिश स्कूल ब्राम्हणगांव विद्यालयात युरोप खंडातील तुर्की सीरिया भुकंपग्रस्त बळींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तुर्की व सीरिया सिमेवर  ७.८ रिश्टर स्केलचा भुकंप झाला. त्यात शेकडो इमारती जमीन दोस्त झाल्या.आजपर्यंत २२ हजारहून अधिक नागरीकांनी आपला जीव गमावला आहे. भारतासह अनेक देशांनी मदतीचा ओघ तिकडे पाठविला आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर चालू आहे .
    सीरियामध्ये दहा वर्षापासून गृहयुद्ध चालु आहे. तसेच अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळे मदतकार्यात अडचण येत आहे. या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी राष्ट्रसंघाने सर्व जगाला मदतीचे आवाहन केले आहे .
      विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री जे. एच.पाकळे यांनी या भुकंपाविषयी सविस्तर माहिती दिली.
      यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक,शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने