📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उज्ज्वल प्राथमिक शाळेत गणित दिवस साजरा



मालेगाव : सोयगाव येथील कलेक्टर पट्टा भागातील कीनो एज्युकेशन सोसायटी संचालित उज्ज्वल प्राथमिक शाळेत गणित दिवस साजरा करण्यात आला. गणित दिवसानिमित्त मानवी साखळीद्वारे भौमितिक आकृत्या साकारण्यात आल्या. त्यात त्रिकोण, चौकोन, आयात, षटकोन, वर्तुळ या आकृत्यांचा समावेश करण्यात आला. तर सकाळ सत्रातील विद्यार्थी व शिक्षकांनी गणित पेटीद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान पटवून दिले. तसेच भौमितीक आकृत्यापासून मानवाची प्रतिकृती साकारली. यावेळी गणित विषय शिक्षक पल्लवी पवार व निलेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षकांनी गणित विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
--------

सोयगाव : येथिल उज्ज्वल प्राथमिक शाळेत गणित दिवसानिमित्त मानवी साखलीद्वारे साकारलेल्या भौमितिक आकृत्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने