महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सौंदाणे ता मालेगाव येथे विद्यालयाचे प्राचार्य एन. जे. निकम यांच्या मार्गदर्शनाने 'क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले' यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी हर्षाली निंबा पवार (उत्पादन शुल्क निरीक्षक, महाराष्ट्र) उपस्थित होत्या.विदयालयाचे प्राचार्य एन. जे. निकम,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षा हर्षाली पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यानंतर प्राचार्य एन जे निकम यांनी प्रमुख पाहुणे हर्षली पवार यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल व महाराष्ट्रातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.यामध्ये प्रांजल पवार,नंदिनी पवार,प्राची पवार, ऋतुजा पवार,राज पवार,दिशा निकम,मयुर पवार,अंकिता पवार या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तद्नंतर ज्यु विभागाचे प्रा व्ही एम खैरनार व उपशिक्षक व्ही एस हाके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेली जनजागृती या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्षा हर्षाली पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज,त्या काळात ओळखलेले शिक्षणाचे महत्त्व विशद केले.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महत्त्व व त्या संदर्भात अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी पाटील व आभार व्ही एस हाके यांनी मानले.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सौंदाणे येथे 'क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले' पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
0