दीड वर्षात औरंगाबादच्या गल्लीबोळात लहान मुलांसाठी सुरू केली 30 बालवाचनालये..
नाशिक ( रुपेश जगताप) रीड अन्ड लीड फाऊँडेशन औरंगाबाद द्वारा संचालित मरयम मिर्जा मोहल्ला मोहल्ला लाईब्रेरी अभियानचा परिचय व मुलांमध्ये वाचन संस्कृति व पुस्तकांविषयी जनजागृति निर्माण करणारे मिर्जा अब्दुल कय्युम नदवी हे आज नासिक शहरात आले होते..
सकाळी आठ वाजता मीर सादिक अली संत साबीर अली मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचलित शाह हायस्कूल वडाळागांव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
उपस्थित विद्यार्थियांना संबोधित करताना मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांनी जिवनात पुस्तकांच महत्त्व आणि वाचन संस्कृतिबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले कि मुलांनी एका पेक्षा जास्त भाषांवर वर प्रभुत्व प्राप्त करावे.. सर्व प्रथम मातृ भाषा वर व नंतर राज्य, राष्ट्रीय व इतर आंतरराष्ट्रीय भाषा.
मिर्जा नदवी यांची कन्या मरियम जी आठवित शिकत आहे तिने कशा प्रकारे आपल्या स्वतच्या 300 पुस्तकां पासुन गल्ली मोहल्लातिल मुलांनासाठी बाल वाचनालय कसं सुरू केलं.. मरीयमची ही अनोखी व आगळी वेगळी कल्पना इतकी लोकप्रिय झाली की अवघ्या दीड वर्षात औरंगाबाद शहरात 30 बालवाचनालये सुरू झाली आणि जवळपास साडेसहा हजार मुलं या उपक्रमात जोडली गेली..
कार्यक्रम प्रसंगी मिर्झा यांचा सत्कार करण्यात आला शाळेचे चेअरमन मसुद पीरजादा, मुख्याध्यापक पिंजारी दादाभाई, मुख्याध्यापिका कुरैशी सुफिया व पिरजादे व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.