📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पिंपळगाव (वा.) विकास संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे बिनविरोध.

प्रतिनिधी देवळा: ज्ञानेश्वर आढाव

           देवळा : पिंपळगाव ( वा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सुजय पोटे यांनी केली. 
     पिंपळगाव विकास संस्थेचे चेअरमन नामदेव थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर मंगळवार ( दि. २९ ) रोजी सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत समाधान सोनजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
     यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप पाटील, उपसरपंच नदिश थोरात, दिनेश वनसे, शरद थोरात, संचालक सुनील पाटील, एकनाथ खैरणार, जितेंद्र थोरात, नामदेव थोरात, नितीन थोरात, संदीप थोरात, साहेबराव बागुल, नर्मदाबाई खैरणार, हिरुबाई वाघ, हनुमंत जाधव, नंदू वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

फोटो : पिंपळगाव (वा.) विकास संस्थेच्या चेअरमनपदी समाधान सोनजे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सत्कार करतांना सुनील पाटील, नदिश थोरात, दिलीप पाटील व उपस्थित संचालक मंडळ.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने