( मालेगाव ) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. २०१४ पासून भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात हा दिवस साजरा करण्यात येतो. जे ए टी महिला महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ आणि समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान आणि महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इतिहास विभागप्रमुख प्रा. राहुल देसले यांचे *भारतीय एकीकरणात वल्लभभाई पटेल यांचे योगदान* या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सरदार पटेल यांनी काय भूमिका बजावली याबाबत विस्तृत विवेचन केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. फरजाना यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी एकता दिवस प्रतिज्ञा वाचन केले आणि त्यांच्यासह सर्व विद्यार्थिनी आणि उपस्थित प्राध्यापक वर्ग यांनी एकत्रितरित्या प्रतिज्ञा घेतली. डॉ. लोधी कनिज फातिमा यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सांगता झाली. याप्रसंगी डॉ. दिनकर सावंत यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या