📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

( मालेगाव) भारताचे दिवंगत राष्ट्रपती सर ए पी जे कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. जे ए टी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावर्षी या दिवसाच्या निमित्ताने इंग्रजी विभागातर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर ए पी जे कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषे मध्ये एकंदर १८० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर प्रश्नमंजुषा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी आयोजित केली होती. सदर स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान आणि समन्वयक डॉ. सलमा सत्तार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने