📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रावळगाव महाविद्यालयात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न स्वर्गीय शुभम वाघ व स्व. डॉ. अस्मिताबाई दिघावकर यांच्या स्मरणार्थ आयोजन

रावळगाव महाविद्यालयात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न स्वर्गीय शुभम वाघ व स्व. डॉ. अस्मिताबाई दिघावकर यांच्या स्मरणार्थ आयोजन

महेंद्र पगार, कुकाणे वृत्तसेवा - श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता. बागलाण जि. नाशिक संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक यांच्या वतीने दि. ०९ ऑक्टोबर २०२२, रोजी स्वर्गीय शुभम वाघ व स्वर्गीय डॉ. अस्मीताताई दिघावकर यांच्या स्मरणार्थ रावळगाव येथे भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेचे शुभारंभ मा. श्री. पुषकराज सूर्यवंशी सो. (पोलीस उप अधीक्षक मालेगाव ग्रामीण) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मरैथॉन स्पर्धेचे अंतर- मुले गट - ५ किमी, मुली गट - ३ किमी. असे अंतर ठेवण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ आणि वाव मिळावा आणि यातून खेळाडू वृत्ती वाढीस लागून विद्यार्थी घडावेत व गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश वाघ यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून ,२३० स्पर्धक सहभागी झाले होते.
            वर्तमानात भारत हा जगातील सर्वात तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु भारतातील वर्तमानातील तरुणाई फॅशनच्या मागे धावतांना मोठ्या प्रमाणात दिसते. मात्र तरुणांनी आपली स्वप्नपुर्ती करण्यासाठी फॅशनपेक्षा पेंशन च्या मागे लागून आपल्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात करियर करावे. मोठमोठ्या कागदीगुण पत्रिकेपेक्षा त्याच्या अंगी एक जबाबदार नागरिक म्हणून चांगली माणुसकी असलेला जबाबदार माणूस होणे गरजेचे आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा.श्री.देवेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक, खाकुर्डी पोलीस स्टेशन यांनी प्रतिपादन केले.
             या स्पर्धेतील विद्यार्थी गटातून अनुक्रमे प्रथम- पावरा विजय तुळशीराम, द्वितीय - पावरा भागीनाथ सुरेश, तृतीय बागुल मनोज विठ्ठल, उत्तेजनार्थ- हिलम मनोज लक्ष्मण तर विद्यार्थिनी गटातून प्रथम- पावरा शेवंता तुळशीराम, द्वितीय पावरा रिया रलबा, तृतीय- खैरनार उज्ज्वला नानाजी, तर उत्तेजनार्थ- पावरा सपना रब्बा या दोन्ही गटातील विजेत्याना मा. श्री. देवेंद्रजी शिंदे, मा. सरपंच श्री.महेश पवार, मा. श्री. चंद्रकांत जाधव यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम ५००१ रु., द्वितीय ४००१ रू. , तृतीय- ३००१ रु., उत्तेजनार्थ- २००१ रू. व स्मृतिचिन्ह तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
             या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशाली सुरेश वाघ, मा. श्री. डॉ. अपूर्व दिघावकर, मा. श्री. नितीन भामरे, मा. श्री. पंकज ठाकरे, कृषी उत्पन बाजार समिती, बागलाण. हे उपस्थित होते, तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. मनीष देवरे,.प्रा. हेमंत कपिले, प्रा. भूषण गावित यांनी भूमिका बजावली.
               या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. नारायण एल. सोनवणे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अदिती काळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जितेंद्र मिसर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. व्ही. डी. बोरसे, प्रा.एस.टी. आंबेकर, प्रा. भरत के. आहेर, प्रा. निलेश महाजन, प्रा. जे. के. अहिरे, प्रा.गीतांजली खैरनार , प्रा. सोनाली निकम, प्रा. मयुरी निकम, प्रा. विजय पगार, प्रा.लक्ष्मी बोरसे , प्रा. सारिका सोनवणे यांच्या सह कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, डी.सी. पाटील, प्रवीण देवरे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव, सचिन भदाणे, राजेंद्र बिरारी, राहुल वाघ यांच्यासह स्पर्धक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होते..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने