नाशिक (रुपेश जगताप)आज दि. 8 पहाटेच्या सुमारास औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून काहींचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की यवतमाळ येथून चिंतामणी ट्रॅव्हल्स ची ही स्लीपर कोच बस काल रात्री नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने निघाली. त्यात ३० पेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करत असल्याचे समजते. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच भाजून त्यांचा मृत्यू झाला.
अपघातातील जखमींची यादी