लक्षवेधी रॅली, माजी विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान, व्याख्यान आदी उपक्रमांनी जल्लोषात साजरा
के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगांव कॅम्प येथे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ७०वा वर्धापन दिन अभूतपूर्व व लक्षवेधी रॅली माजी विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान, व्याख्यान आदी उपक्रमांनी जल्लोषात साजरा तसेच महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचा वर्धापनदिन व जयंतीचे औचित्य साधून एनसीसी, स्काऊट व इतर विद्यार्थ्यांची लेझीम, ढोल, ताशाच्या गजरात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या जयघोषाने अभूतपूर्व रॅली लक्षवेधी ठरली तसेच विद्यालयाचे विविध क्षेञात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान, संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण, व्याख्यान विद्यार्थ्यांचे मनोगत आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य राजेंद्र पाटील होते. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक नितीन गवळी पर्यवेक्षक संजय शिंदे , पर्यवेक्षक सुभाष निकम, ज्येष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे, कार्यालयीन प्रमुख जितेंद्र विसपुते, संजय सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षिका जे.एस. देवरे माजी विद्यार्थी हेमंत देवरे ,प्रसिद्धी विभागाचे प्रमुख राजेश धनवट व्यासपीठावर उपस्थित होते.
भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचे पूजन करून कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण उपप्राचार्य राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवराच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, महात्मा गांधी ,स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे माजी ७० विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. नीट व जेईई या परीक्षेत रितेश वैद्य व अथर्व नेरकर यांनी गौरवास्पद यश संपादन केल्याने विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिक्षिका श्रीमती मनीषा आहेर यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट विशद करून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य राजेंद्र पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती देऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे ,लोकनेते व्यंकटराव हिरे , राष्ट्रपिता महात्मा गांधी ,माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन केले. सूञसंचालन आर.डी.शेवाळे यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसी सी विभागाचे प्रमुख आर. के. बोरसे, स्काऊट विभागाचे प्रमुख एस. एस. ठाकरे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक योगेश गांगुर्डे, जे.टी.ठाकरे.एस.एल.निकम, जितू बच्छाव, सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे, राजेंद्र बच्छाव तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.