📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

0

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी शुद्ध स्वार्थी होणे गरजेचे - मा. अॅड. शिशिर हिरे

            रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. २३ मार्च २०२४ या रोजी वार्षिक गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र बी. गोसावी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ हे तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून अॅड. शिशिर हिरे विशेष सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय, विनोद जाधव आर.टी.ओ. अधिकारी मालेगाव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.क्यू.ए.सी. विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र मिसर यांनी केले त्यात त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक गुणगौरव समारंभाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. शिशिर हिरे विशेष सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय समाजामध्ये गुरूला खूप म्हत्वाचे स्थान असून, गुरूच्या योग्य मार्गदर्शनामुळेच कोणताही व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो. माझ्या उच्च न्यायालयापर्यंतच्या यशस्वी प्रवासामध्ये गुरुचे योगदान खूप महत्वाचे राहिले आहे. वर्तमान युग हे स्पर्धा परीक्षेचे युग असून विद्यार्थ्यांना कोणत्या ही क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवून यश संपादन करायचे असेल किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून व शुद्ध हेतू ठेवून ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतले तर यश नक्कीच भेटत असते, हे यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत शुद्ध स्वार्थी होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रा वक्ते अॅड. शिशिर हिरे विशेष सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी यावेळी केले.
          यावेळी मार्गदर्शन करताना विनोद जाधव आर.टी.ओ. अधिकारी मालेगाव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत स्वयं शिस्तीचे महत्त्व पटवून सांगून, यशाच्या वाटेत अपयश आले तरीही खचून न जाता नव्याने उभे राहण्याचा संदेश दिला.
            यावेळी विद्यापीठ परीक्षेमध्ये मागील वर्षात पदवी व पदव्युत्तर वर्गातील सर्व शाखेतील सर्व वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे, विद्यापीठीय विविध क्रीडा स्पर्धा प्रकारामध्ये यश संपादन केलेल्या व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रिडा स्पर्धेत सहभागी होऊन नावलौकिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, महाविद्यालय स्तरावरील आयोजित निबंध स्पर्धा, भिंतीपत्रक प्रदर्शन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे गट प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळामार्फत राबविलेल्या विविध उपक्रमात व आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
          यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र गोसावी म्हणाले की, आजचा काळ हा स्पर्धेचा काळ असून या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतोच त्यामुळे विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळावी व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गुणगौरव समारंभ महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्षाची तयारी ठेवावी. असे प्रतिपादन केले.
            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे, तसेच डॉ. विष्णू बोरसे, प्रा. भरत आहेर, प्रा. निलेश महाजन, प्रा. दिपक अहिरे, डॉ. त्रिमूर्ती सोमवंशी, प्रा. निलेश देवरे, प्रा. मनीष ठोके, प्रा. वर्षा पवार, प्रा.सौ.जी.एस.खैरनार, प्रा. सौ. मोहिनी आहेर, प्रा. अदिती काळे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. प्रांजल पवार, प्रा.जिंकल पटेल, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. रुची देवरे, प्रा. सोनम पाटील, प्रा. प्रचीती देवरे, प्रा.प्रियंका भामरे, प्रा. चेतना अहिरे, यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक दिपक पवार, महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, प्रवीण देवरे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव, सचिन भदाणे, राहुल अहिरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)