📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय औद्योगिॅक भेटीचे यशस्वीरित्या आयोजन

0
रावळगाव प्रतिनिधी :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना केमिकल व वाईन इंडस्ट्री ची माहिती मिळावी म्हणून महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत दिनांक १९ मार्च २०२४ रोजी पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड, पिंपळगाव बसवंत व चांदोन वाईनरी ता. दिंडोरी जि. नाशिक येथे एक दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
            या भेटीमध्ये चांदोन वाईनरीच्या वाईन अॅम्बेसेडर भैरवी पोरे यांनी चांदोन वाईनरीच्या इतिहासाबरोबरच द्राक्षापासून वाईन उत्पादनाच्या प्रक्रियेबद्दल परिपूर्ण अशी माहिती दिली व या प्रसंगी त्या म्हणाल्या, "सध्या भारतातील ९० टक्के वाईन उत्पादन महाराष्ट्रात होत असून त्यामुळे राज्यात वाईन पर्यटनही वाढले आहे. तसेच यामुळे रोजगारही उपलब्ध होत आहेत." तसेच पिंपळगाव बसवंत येथील पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड येथील असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर श्री. स्वप्नील सोनवणे यांनी वेगवेगळ्या केमिकल उत्पादनाच्या प्रक्रियेची माहिती देऊन प्रात्याक्षिके दाखवली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील केमिकल तपासणीसाठी लागणारे इन्स्त्रुमेंट, पंकेजिंग, ट्रान्स्पोर्ट, विक्री, उद्योग उभारण्यासाठी लागणारी साधनसामुग्री, आर्थिक नियोजन इ. व केमिकल उत्पादनाच्या प्रक्रियेबाबत सखोल असे मार्गदर्शन त्यांनी केले.
         सदर भेटीचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादाजी वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र गोसावी व उपप्राचार्य प्रा. जे. व्ही. मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोहिनी एस. निकम, श्री. अमोल शिंदे व श्री. सचिन भदाणे यांनी केले. भेटीच्या यशस्वीतेसाठी चांदोन वाईनरी येथील इस्टेट डायरेक्टर राजेश दिक्षित पूर्वा केमटेक येथील प्रोडक्शन मॅनेजर रवींद्र अहिरे, केमिस्ट संकेत बोंडे, रा. प. मं.चे कर्मचारी गणेश दासनूर तसेच रावळगाव महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. प्रियंका भामरे, प्रा. जे. के. आहिरे, महेश बच्छाव यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर भेटीचे नियोजन रसायनशास्त्र विभागाच्या एम. एस. स्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले असून त्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग दर्शविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)