📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष अरबी उर्दू पाठ्यक्रम पुनर्गठन कार्यशाळा

0
(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयातील उर्दू , पर्शियन विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्शियन, अरबी, उर्दू अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष पर्शियन,अरबी आणि उर्दू पाठ्यक्रम पुनर्गठन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अन्सारी मोहम्मद हारून हे होते. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जे ए टी महाविद्यालयाच्या उर्दू पर्शियन विभाग प्रमुख डॉ अन्सारी फहमिदा यांनी सदर कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखड्यानुसार सदर अभ्यासक्रमाचे पुनर्गठन करण्यात अशाप्रकारे करण्यातआलेले आहे हे स्पष्ट केले. कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उर्दू अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ साजिद अब्दुल हाफिज यांच्या हस्ते झाले. त्यांनी बदललेले शैक्षणिक धोरण आणि त्यातील पर्शियन भाषेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी उर्दू अभ्यास मंडळासाठी डॉ. अजमल दलाल ( अभ्यास मंडळ सदस्य आणि आबेदा इनामदार महाविद्यालय उर्दू विभाग प्रमुख) यांनी मार्गदर्शन केले.‌ प्रा. जावेद अख्तर,( पुना कॉलेज) यांनी पर्शियन अभ्यास मंडळाचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. अरेबिक अभ्यास मंडळाचे प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. रहमतुल्ला खान ( आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय पुणे) यांनी मार्गदर्शन केले.‌ याप्रसंगी डॉ महजबीन ( आबेदा इनामदार महाविद्यालय पुणे) डॉ युसुफ खान साबीर (राजस्थान विद्यापीठ), डॉ अब्दुल लतीफ ( माजी अभ्यास मंडळ सदस्य) डॉ शगुफ्ता अब्दुल हाफिज ( विषय तज्ञ) इ. सह अनेक मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान मारिया ( तृतीय वर्ष उर्दू विभाग) हिने केले. डॉ फहमिदा अन्सारी यांनी उपस्थित यांचे आभार मानले आणि कार्यशाळेचा समारोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)