📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न


( मालेगाव ) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा विकास समिती आणि मालेगाव महानगरपालिका निमा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या युगात स्त्रियांमध्ये, तरुणींमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखे आजार उद्भवतात जे शरीरासाठी घातक असतात म्हणूनच सदर शिबिरामध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या *'माता सुरक्षित घर सुरक्षित*' या उपक्रमांतर्गत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ बहुसंख्य विद्यार्थिनींना झाला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारून मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांची होती. मालेगाव महानगरपालिकेच्या निमा केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.अलका भावसार यांनी विद्यार्थिनींना अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले. रक्तात आयर्नची कमतरता होण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय याबाबत विस्तृत माहिती दिली मालेगावातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि इनरव्हील क्लब च्या सदस्य डॉ. शितल देसले यांनी विद्यार्थिनींना आहाराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व विद्यार्थिनींना आयरन च्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील केले. महिला सुरक्षा विकास समितीच्या समन्वयक प्रा.सुनेत्रा मेश्रामकर यांनी सदर शिबिराचे आयोजन केले. त्यांनी शिबिराबाबत विस्तृत माहिती विद्यार्थिनींना दिली. उपस्थितांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन कु. मुनझ्झा मोहम्मद आझम हिने केले. कु. अनुशिया नासिर खान हिने उपस्थितांचे आभार मानले आणि शिबिराची सांगता झाली.

 अविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

महाविद्यालयात अविष्कार स्पर्धा महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्याच्या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी करण्यात येते. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी सदर स्पर्धे अगोदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या डॉ. प्रज्ञा सुरवसे आणि जे ए टी महिला महाविद्यालयाच्या डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना स्पर्धे बाबत असलेले नियम आणि त्यांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले . स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कला आणि विज्ञान शाखेतील २८ संघांनी सहभाग नोंदविला. प्रा. अबुलैस निहाल अन्सारी (विभाग प्रमुख भौतिकशास्त्र) आणि प्रा. व्ही के पवार (विभाग प्रमुख भूगोल) यांनी तज्ञ परीक्षक म्हणून काम पाहिले. कला शाखेतील दोन,, विज्ञान शाखेतील एक आणि संगणक शाखेतील एक अशा एकूण चार संघांची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थिनींचे जे ए टी ट्रस्टचे अध्यक्ष हाजी निहाल अहमद अन्सारी यांनी तसेच प्राचार्य डॉ. हारुण अन्सारी, समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी अभिनंदन केले. डॉ. अन्सारी फरजाना यांनी प्रास्ताविक केले. डॉ. याह्याखान पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि स्पर्धेची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने