📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

प्राचार्य प्रवीण पाटील यांचा सेवापूर्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न



     के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील प्राचार्य प्रवीण पाटील २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापुर्ती सोहळा महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य तात्यासाहेब अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त तथा म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश शिरूडे , संस्थेचे संचालक तथा निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, त्र्यंबकेश्वर येथील वास्तु विशारद रतिश बापू दशपुत्रे उपस्थित होते . यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य बी.वाय. पाटील, माजी प्राचार्य वाय.आर.पवार,माजी प्राचार्य सुधाकर निकम, प्राचार्य के.डी. दाभाडे,उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम , कार्यालयीन प्रमुख संजय सूर्यवंशी,प्राचार्य कल्पना देसले प्राचार्य अहिरे प्राचार्य पीसी पाटील हेमंत देवरे प्रफुल्ल निकम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून सेवापुर्ती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम प्राचार्य प्रवीण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या समाधीचे व पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
         सत्कारमूर्ती प्राचार्य प्रवीण पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभा प्रवीण पाटील यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक  अनिल पवार, प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त डॉ. दिनेश शिरूडे,संस्थेचे संचालक प्राचार्य डॉ. सुभाष निकम , त्र्यंबकेश्वर येथील रतिष बापू दशपुत्रे,प्राध्यापिका शितल शिंदे यांच्या हस्ते चांदीची गणेशाची मूर्ती ,सन्मानपत्र, शाल,कपडे, साडी,श्रीफळ, पुष्पगुच्छ ,सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
        यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ शिक्षक के.डी. देवरे ,प्राध्यापक महेंद्र दासनूर, प्राध्यापक प्रल्हाद बच्छाव, सत्कारमूर्ती प्रवीण पाटील सरांचे चिरंजीव सौरभ पाटील ,कन्या शुभांगी पाटील, माजी प्राचार्य बी.वाय पाटील ,मामी सुचेताबच्छाव यांनी मनोगतातून प्राचार्य प्रवीण पाटील सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
        प्रमुख अतिथी त्र्यंबकेश्वर येथील वास्तुशाह रतिष बापू दशपुत्रे यांनी सरांच्या कार्याचा गौरव करून सत्कारासाठी उपस्थित असलेल्या जनसमुदायावरूनच सरांच्या कार्याची ओळख होत असल्याचे गौरवोद्गार काढले.
       प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक तथा प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी प्राचार्य प्रवीण पाटील यांच्या कामाचा गौरव करताना सरांनी कर्तव्यनिष्ठपणे आणि जबाबदारी पूर्वक २९ वर्ष शिक्षक ,पर्यवेक्षक, प्राचार्य म्हणून काम करताना आपल्या शिक्षक सेवेबद्दल नितांत प्रेम ध्यास आणि विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नेहमीच विद्यार्थी हिताचाच विचार केला . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली. अत्यंत मनमिळावू, संयमितपणा, बौद्धिकचमक दिमाखदार व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे त्याची वेगळीच छाप विद्यार्थ्यांवर पडत असे गौरवोद्गार सत्कार समारंभ प्रसंगी काढले.
            प्रमुख अतिथी तथा संस्थेचे विश्वस्त म.स.गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरूडे यांनी सत्कारमूर्तींचा गौरव करताना नावातच प्रवीण असल्याने संपूर्ण सेवाकाल प्राविण्यतेने यशस्वीपणे पूर्ण करून संस्था शाळा आणि विद्यार्थ्यांचे हीत जपत प्रामाणिकपणे सेवा केल्याचा परिपाक म्हणजे आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतो असे कौतुक करून सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
         सत्कारमूर्ती प्राचार्य प्रवीण पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची संधी मिळाली याबद्दल समाधी समाधानी असल्याचे सांगत २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा देत संस्थेविषयी संस्थाचालकांविषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक  अनिल पवार यांनी यांनी पाटील सराच्या २९ वर्षाच्या प्रामाणिक कामाचे कौतुक करून विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती नंतरचे आपले उर्वरित आयुष्य सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
      सत्कारमूर्ती चा परिचय व सन्मानपत्राचे वाचन राजेश धनवट यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार शशिकांत पवार यांनी मानले. यावेळी पाटील सरांचे मेहुणे बी.डी.तोडकर , बहिण मिनाक्षी तोडकर, जावई अमोश बोरसे,जावाई तुषार देवरे, आजोबा साहेबराव अहिरे तसेच कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख अतिथी तसेच व्यासपीठावरील आजी-माजी प्राचार्य , आप्तेष्ट यांचा पाटील सरांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आप्तेष्ट, मिञ,, संस्थेतील आजी-माजी प्राचार्य, शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी ,शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. उपस्थित आप्तेष्ट व मित्र परिवाराच्या वतीने प्राचार्य प्रवीण पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे , व्यंकट मगर, आनंद भालेराव, एस. डी. महाले, एन. डी. शिरोळे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य लाभले. एकूणच प्राचार्य प्रवीण पाटील यांचा सेवाप्रती सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने