📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुरस्कार उत्तम कार्यासाठी प्रेरणा देतात : ना.भुसे; एस फाऊंडेशनच्या ग्रॅटिट्यूड अवार्डचे वितरण

मालेगावः शिक्षक हे समाजाचे महत्त्वाचे घटक असून हे पुरस्कार शिक्षकांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतील' अशा शब्दांत ना.भुसे यांनी शिक्षक तथा एस संस्थेचाचा गौरव केला. 
येथील हरिकेश लॉन्स येथे एस फाऊंडेशन मालेगाव यांच्याकडून देशभरात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना आज मालेगाव येथे ग्रॅटिट्यूड अवॉर्ड देऊन दिमाखदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भावना पोफळे यांच्या आवाजातील ईशस्तवनाने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. भुसे यांच्या हस्ते देश पातळीवरील सतरा तर राज्य पातळीवरील अडतीस शिक्षकांचा एस ग्रॅटिट्यूड अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक आर.के.बच्छाव होते. व्यसपीठावर 'आय .टी .विभाग प्रमुख योगेश सोनवणे पुणे, साहेबराव निकम विस्ताराधिकारी मालेगाव,रोटरी ट्रस्ट ट्रस्टी विजय पोकळे, लिटल एंजल्स स्कूलचे प्राचार्य दिनेश पवार,देशमुख माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिपक वाघ, सुदाम साळुंखे बाळासाहेब भामरे , इंडियन एन.एक्सचे संचालक राजेश दत्तानी, हरिकेश लान्सचे संचालक बापू हरिश्चंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मालेगावातील एस (ACE )फाउंडेशन ही शासनमान्य सेवाभावी संस्था आहे. वर्धापन दिन साजरा होत आहे .कला,संस्कृती, शिक्षण, पर्यावरण, महिला आणि बालकल्याण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात भरीव कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत आजपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत जसे की वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ,शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, मास्क वाटप ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर ऑनलाईन स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बच्छाव यांनी आपल्या मनोगतात आजच्या दिवशी पौर्णिमा आहे आज या एस फाउंडेशन च्या भगिनींना बघून हिरकणी ची आठवण झाली एस फाउंडेशन च्या कार्यकारिणी ने पहिल्या वर्धापनदिनी दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे एस फाउंडेशन हे आज लहान स्वरूपातील बालकाप्रमाणे आहे त्याचे निश्चित पणे वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या सर्व महिला भगिनी हिरकणीसारख्या रणरागिणी असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पुष्परचना , गीतगायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून ह्या भगिनी संस्कृती ची जपणूक आणि संस्कार रुजविण्या आणि प्रसाराचे कामही करीत आहेत एस फाउंडेशन या संस्थेचे काम सातासमुद्रापार कसे पोहचेल यासाठी मदतीचे आश्वासन दिले. 
यावेळी दीपक वाघ, पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन बोढे चंद्रपुर व सुनीता लहाने अमरावती यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक संस्थेच्या खजिनदार छाया देसले यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश बच्छाव यांनी केले तर आभार उपाध्यक्ष मनिषा ठाकूर यांनी मानले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली भामरे,उपाध्यक्ष मनिषा ठाकूर सरचिटनीस ज्योती पाटील,कोषाध्यक्ष छाया देसले, कार्याध्यक्ष दिपाली शिंदे, संचालक भाग्यश्री भामरे व योगेश शेवाळे ,सल्लागार सुभाष पाटील व कैलास पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने