📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींच्या मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर


राकेश आहेर:- देवळा

  राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंतच्या मुदत संपणाऱ्या देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या संगणक प्रणालीद्वारे मतदारयादींचा कार्यक्रम राबविण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यानुसार तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्या १३ ते १८ आॕक्टोबर पर्यंत तहसील कार्यालय, तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 
   दि. १८/१०/ २०२२ पर्यंत मतदार याद्यांनवरील हरकती व सूचना तहसील कार्यालय येथे दाखल करता येतील. तसेच प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या शुक्रवार दि. २१/१०/२०२२ ला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत अशी माहिती देवळा तहसीलदार विजय सुर्यवंशी व निवडणूक नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने