के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प व दीया आय केअर सेंटरचे डाॅ. अभिजीत निकम व डॉ. ज्योती निकम यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुपच्या विश्वस्त संपदा (दिदी) हिरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेञातील उल्लेखनीय योगदानाबद्दल " कन्या-माता" मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. नेञ तपासणी शिबिराचे उद्घाटक व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कैलास दाभाडे होते. यावेळी उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे ,पर्यवेक्षक सुभाष निकम, ज्येष्ठ प्राध्यापिका शितल शिंदे, दिया आय केअर सेंटरच्या सोनल पवार ,अस्मिता गांगुर्डे, अनिकेत यशोद, उमेश पवार,कार्यालय प्रमुख जितेंद्र विसपुते ,संजय सूर्यवंशी, प्राध्यापिका स्मिता खैरनार , प्राध्यापिका पद्मावती कानडे व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटराव हिरे, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्राध्यापिका श्वेता पाटील यांनी दीदींच्या कार्याची माहिती दिली.
प्राचार्य कैलास दाभाडे यांनी संपदा दीदी हिरे यांच्या कार्याचा गौरव करून विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देऊन माता कन्या नेत्र तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी माता कन्या याची मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास माता कन्या यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रास्ताविक राजेश धनवट यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार प्राध्यापक विलास खैरनार यांनी मानले.नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रवीण पवार. प्रा. महेंद्र दासनूर, प्रा.सुभाष अहिरे, प्रा. बाळासाहेब ठाकरे ,सुनील सूर्यवंशी ,हेमंत पगारे, क्रीडा शिक्षक शशिकांत पवार,जे.टी.ठाकरे, प्राध्यापक विश्वास पगार,प्राध्यापक आर.एम.सूर्यवंशी प्राध्यापक प्रशांत सोनवणे,प्राध्यापक प्रल्हाद बच्छाव, प्राध्यापक एम.जे. पाटील,प्राध्यापिका आरती देवरे, आशा पगार तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू यांचे सहकार्य लाभले.