📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा-सटाणा रस्त्यावरील हॉटेल बाडमेर जवळ बस आणि कारचा अपघात

राकेश आहेर:- (देवळा)

   देवळा येथील हॉटेल बाडमेर जवळ शुक्रवार दि १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बस व कारमध्ये भिषण असा अपघात झाला होता. यात कारमधील दोन जण गंभीर तर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यात बसचालकाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकहुन साक्रीच्या दिशेने जाणारी बस क्र एम.एच २०, बी.एल १८४० या बसला देवळा सटाणा रोडवरील बाडमेर हॉटेल जवळ समोरून येणारी कार क्रमांक एम.एच ०४/ इ.एच ४१२ ने धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. 
   अपघातात कारमधील दोन प्रवासी त्यात समाधान कापडणीस, रा. जायखेडा ता. बागलाण व पवण मन्साराम चव्हाण, रा. ब्राम्हणपाडे ता. बागलाण हे जखमी झाले आहेत. त्यांना प्रथमतः देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे प्रथमोपचार घेऊन त्यांना नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती देवळा पोलीसांकडून मिळाली आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. तर बस मधीलही काही प्रवासी जखमी झाले आहेत. 
  अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीसांनी वाहतूक लगोलग सुरळीत केली. या अपघाताचा देवळा पोलीसांत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालकाने प्रसंगावधान राखून बसवर ताबा मिळवला यामुळे बसमधील प्रवासी सुखरूप वाचले व मोठा अनर्थ टळला.
    या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, चंद्रकांत निकम आदी करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने