📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

उज्ज्वल शाळेत 'वाचन संस्कार कट्टा' सुरू

मालेगाव : येथील किनो एजुकेशन संचलित उज्ज्वल प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका अर्चना गरुड होत्या.त्यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या संकल्पनेतुन वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी 'वाचन संस्कार कट्टा' सुरू करण्यात आला. त्यात पाचशे हुन अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्याध्यापिका गरुड यांच्या हस्ते वाचन संस्कार कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तनुश्री कोळी व तनुश्री कुऱ्हाडे या विद्यार्थिनी पथनाट्य सादर केले. व विद्यार्थ्यांची भाषणे झाली. उपशिक्षिका ज्योती भामरे व पूनम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास स्वाती आहिरे, अमोल ठोके, शीतल बेडसे, निलेश पवार, प्रतिभा बागुल, पल्लवी पवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बच्छाव यांनी केले. 
-----------
सोयगाव : येथील उज्ज्वल प्राथमिक शाळेत वाचन संस्कार कट्ट्याचे उदघाटन करतांना मुख्याध्यापिका अर्चना गरुड

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने