नाशिक:
शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता हाच 'मविप्र'चा पाया आहे. मतभेद विसरून गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूयात. १०८ वर्षाची परंपरा असलेल्या मविप्र संस्थेतील प्रत्येक घटक व त्याचे योगदान महत्वाचे आहे. सरचिटणीस अॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सन २०२२ ते २०२७ या कार्यकालासाठी सभासदांनी म.वि.प्र. समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळात ‘परिवर्तन’ घडविले. निवडणूक प्रचारा दरम्यान परिवर्तन पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार समाजातील सर्व घटकांना बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्याच बरोबर सर्व सभासदांना मानाची वागणूक व देखील यथोचित सन्मान मिळेल असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे नवनिर्वाचित चिटणीस दिलीप दळवी यांनी केले. सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने महाराष्ट्रातील अग्रणी असलेली मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळातील चिटणीस श्री. दिलीप सखाराम दळवी, महिला संचालिका श्रीमती शालनताई अरुण सोनवणे आणि बागलाण तालुका संचालक डॉ. प्रशांत सोनवणे आदींचा सत्कार प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या पदाधिकारी व मान्यवरांंचा सत्कार समारंभाच्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

*विद्यार्थीनींनी पुढे यावे:शालनताई सोनवणे*
संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महिला, विद्यार्थिनी शिक्षणासाठी पुढे यावे. काही समस्या असल्यास त्यांचे निराकरण तत्परतेने करणार आपण सदैव कार्यरत असल्याचे मविप्रच्या महिला संचालिका शालनताई सोनवणे यांनी सांगितले.
*प्राध्यापक हा विद्यार्थी घडविणारा देवच : डॉ. प्रसाद सोनवणे*
समाज घडवितांना पालकांपेक्षा प्राध्यापकाची जबाबदारी जास्त आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शिकायला पाठवले असते कारण प्राध्यापक हा विद्यार्थी घडविणारा देवच असतो. प्राध्यापकांच्या अंगी मिलीटरी शिस्तच हवी. मविप्र हे डबके नव्हे तर राष्ट्रउभारणीत योगदानासाठी गुणवत्तापुर्ण शिक्षण देणारा एक विशाल सागर आहे असे प्रतिपादन मविप्र चे बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी केले. बी-फार्मसी, डी-फार्मसी यांसारख्या महाविद्यालयांची उभारणी बागलाण मध्ये करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. उपक्रमशील अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा असे आवाहन शिक्षकांना केले.
*शेतकर्यांचे महाविद्यालय: प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड*
जगाचे पोट भरणार्या शेतकर्यांचे महाविद्यालय अशी सटाणा महाविद्यालयाची ओळख आहे. सटाणा महाविद्यालयात पेटंट प्राप्त व आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर रिसर्च पेपर प्रकाशित करीत नाविन्यपुर्ण संशोधन मांडणारे असंख्य तज्ञ प्राध्यापक तसेच प्रामाणिक कर्मचारी आहेत. ते अत्यंत शिस्तीने व प्रामाणिकपणे टिमवर्क करीत सुसंस्कृत समाज व देश घडवितात हे संस्थेचे अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. महाविद्यालयात जगातील अद्यावत तंत्रज्ञान सुविधा आहेत. 'बहुजन हिताय बहजन सुखाय' ध्येयाने प्रेरीत तत्वनिष्ठ धुरींनी उभारलेली संस्था म्हणजे मविप्र ही लोकशाही पद्धतीने चालणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था होयअसे प्रतिपादन मविप्रच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अर्थात सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांनी केले. सटाणा महाविद्यालयातर्फे पंचवार्षिक मान्यवरांंचा सत्कार समारंभाच्यावेळी प्रास्तविक करतांना ते बोलत होते.
या प्रसंगी बागलाण कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन संजय देवरे, लखमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच केवळ दळवी, श्री. दिलीप सोनवणे, श्री. अरुण सोनवणे, श्रीमती रेखा सोनवणे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. एस. गुंजाळ, लोकनेते पंडित धर्मा पाटील, मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दळवी यांना देखील गौरवण्यात आले.
प्रारंभी संगीत विभागाच्या विदयार्थी समुहाने स्वागतगीत सादर केले. सुत्रसंचालन प्रा. अमित निकम यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. एस पी कांबळे यांनी मानले.
सटाणा महाविद्यालयाचे आईक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत कोळी, कार्यालयीन अधिक्षक एस टी निकम व डी एल अहिरे, जे एम बच्छाव अण्णा, प्रा मनोहर गावीत, प्रा महेश वाघ, डॉ आर डी वसाईत, श्रीमती एस बी शेवाळे, ग्रंथपाल पंकज शेवाळे, कनिष्ठ विज्ञान विभाग प्रमुख प्रफुल्ल ठाकरे, ग्रंथालय परीचर रविंद्र देवरे, सर्व कार्यालयीन व विभाग प्रमुख, उपप्राचार्य आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.