📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात फ्रेशर्स साठी ओरिएंटेशन शिबिर

(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात विशाखा समिती आणि महिला सुरक्षा विकास समितीतर्फे प्रथम वर्ष कला आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींसाठी ओरिएंटेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . सदर शिबिरात विशाखा समिती आणि महिला सुरक्षा विकास समितीचे हेतू आणि कार्य याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ.सलमा अब्दुल सत्तार आणि महिला सुरक्षा विकास समितीच्या समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी मार्गदर्शन केले. विशाखा समिती नियमावली आणि विशाखा कायदा याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा समिती समन्वयक डॉ. होमायरा यांनी केले. डॉ. खान रुमाना यांनी आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने