📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शिवराजे मित्र मंडळात रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 देवळा | ज्ञानेश्वर आढाव

         शिवराजे मित्र मंडळ कळवण रोड देवळा आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ९२ दात्यांनी रक्तदान केले. "रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्त पेढीतील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. या मुळेच रुग्णांचे रक्तासाठी होत असलेले हाल लक्षात घेता शिवराजे मित्र मंडळा तर्फे गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवारी दि. 4/9/2022 रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरात ज्येष्ठ रक्तदाते हिरामण चिंधा आहेर ह्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, देवळा नगर पंचायतीचे चे गटनेते संभाजी आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, वृक्षप्रेमी सुनील आहेर सर, जी व्ही आहेर सर, कृष्णाजी भामरे, वसंत आढव, सुनील आहेर, मंडळाचे संथापक अध्यक्ष किरण आहेर, अध्यक्ष रुपेश आहेर, उपाध्यक्ष रितेश निकम तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
शेवटी मंडळाचे उपाध्यक्ष रितेश निकम ह्यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने