(मालेगाव) मालेगाव येथील जे ए टी महिला महाविद्यालयात कला शाखेतर्फे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रती असलेले प्रेम आणि आदर याचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील उर्दू पर्शियन, इंग्रजी आणि राज्यशास्त्र या विभागातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम आणि द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले आणि सर्व उपस्थित प्राध्यापक वर्गाला गुलाब पुष्प आणि भेटी देऊन आपले प्रेम व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि गीता द्वारे आपल्या भावना प्रगट केल्या. उर्दू पर्शियन विभाग प्रमुख डॉ
फहमीदा अन्सारी यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद केला. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी आपल्या मनोगताद्वारे आपले विचार प्रगट केले आणि विद्यार्थिनींना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ लोधी कनिझ फातिमा, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनीता देसले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु उजमा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. अनुशिया कु. मुंनझ्झा यांनी परिश्रम घेतले.आणि कार्यक्रम यशस्वी केला कु. अनुशिया हिने आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली