दि.05 नामपुर सटाना रस्त्यालगत साईड पट्ट्या नसल्याने आपला जीव मुठीत घेऊन नागरिकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे शहराला जोडला जाणारा मुख्य रस्ता म्हणून नामपुर सटाना रस्त्याकडे बघीतले जाते यालगत कांद्याचे मोठ मोठे शेड आहेत त्यामुळे रस्त्यावर रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा देखील याच रस्त्यालगत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होत असते नुकत्याच झालेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी नामपुर ते कुपखेडा रस्त्याच्या साईड पट्ट्या अद्याप तसेच असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहेत आणि रस्त्यालगत असणारे काटेरी झुडुपमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन मागिल महिन्यात देखील शेतकरी चे कांद्याचे भरलेले ट्रॅक्टर उलटले होते हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष मुळे होत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर साईड पट्ट्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी सहाय्यक अभियंता सा.बां.विभागाकडे भाजपा आदिवासी आघाडी चे तालुका उपाध्यक्ष आकाश साळुंके सरपंच परिषद चे तालुका अध्यक्ष संदीप राजा पवार , सचिन सोनवणे , जिभाऊ तलवारे यांनी केली आहे.