📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विविध विषयांवर चर्चा, शासनाची बदलती भूमिका यावर बारा बलुतेदार महासंघाची बैठक औरंगाबाद येथे संपन्न

औरंगाबाद येथे बाराबलुतेदार महासंघाची बैठक हॉटेल ऑरेंज प्लग येथे दि.१ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. बैठकीस राज्यातील ओबीसी वर्गातील बाराबलुतेदार, अलुतेदार,भटके विमुक्त, आदिवासी समाजातील ३० अध्यक्षांच्या उपस्थितीत आजच्या राजकीय न्यायालयीन भूमिका व निवडणूक आयोगाचा निर्णय, शिक्षण व नोकरीतील आरक्षण, आर्थिक, व सामाजिक विषयी होणाऱ्या राज्य शासनाच्या अन्यायकारक भूमिके विषयी चर्चा झाली. ओबीसी समाजाची जनगणना व रोहिणी आयोग लागू करावा असा ठराव करण्यात आला. ठराव व बैठकीचा इतिरुत्त राज्यशासनास पाठविण्यात येणार आहे. त्याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष कल्याणराव दले होते चंद्रकांत गवळी, श्रावण देवरे, लक्ष्मण वडले, औरंगाबादचे माझी महापौर घडामडे, भगवान वाघमारे, स.सो. खंडाळकर, प्रतापराव गुरव, सतीश दरेकर, सतीश कसबे, दत्तात्रय चेचार, शशिकांत आमने, दामोधर बिडवे, भगवान श्रीमंदिलं, गजानन अहमदाबाद, अशोक राऊत, राजेश पंडित, विष्णुपंत पांचाळ, साहेबराव कुमावत, अनिल शिंदे, झगडे मॅडम, महेश निणाळे प्रकाश कानगावकर, भारती कुमावत, बाळासाहेब भुजबळ, दत्ता राजगुरू, सतीश जयकर, लक्ष्मण राजगुरू, बोराडे साहेब, अड. महेंद्र राऊत,अलका सोनवणे, डॉ रमेश कैवडे, विजय शिंदे, डॉ अभिजित भावसार, रमेश चौधरी, चंद्रशेखर कापडे, सुदामराव जाधव, डॉ सतीश बोडदे, किशोर सूर्यवंशी, प्रा कारभारी जाधव, निशांत पवार, माऊली गायकवाड, अंबादास शिंदे, व इतर उपस्थित अध्यक्षांनीही चर्चेत भाग घेतला.*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने