सोयगाव (वार्ताहर) सोयगाव भागातील जिजामाता नगर येथील योगेश बाळू ठाकरे ( वय 40 )या तरुणाने आज दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता राहत्या घरात छताला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आईने झोपेतून जाग आल्यानंतर बघितले असता आपला मुलगा योगेश याने एका रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, आजूबाजूच्या नागरिकांनी सोयगावचे पोलीस पाटील कैलास पाटील यांना संपर्क साधून माहिती दिली, त्यानुसार पोलीस पाटलांनी ही माहिती पोलिसांना कळवल्यामुळे कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी श्री प्रकाश काळे व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानुसार घटनेचा पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.
सदर तरुण हा घरांना रंग देण्याचे काम करत होता, व घरात आई व मुलगा हे दोघेच राहत होते,
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहे