मालेगाव (जय योगेश पगारे ) बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे अत्यंत धक्कादायक आणि अंगाला काटे आणणारी हृदयद्रावक घटना घडली आहे, पत्नीने आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच पतीने ही विहिरीत उडी मारत जीवनयात्रा संपवली.
रूपाली प्रकाश याळिज व प्रकाश शंकर याळिज असे या दांपत्याचे नाव असून या घटनेमुळे बागलाण तालुका हादरला आहे, स्थानिकांच्या माहितीनुसार रूपाली यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू असल्याचे समजते.
पती-पत्नीने एकाच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांची नववीत शिकणारी एकुलती एक मुलगी आणि पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकणारा त्यांचा मुलगा यांचे भविष्य मात्र पोरके झाल्याने मन सुन्न घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.