मालेगाव येथील जे ए टी कला विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात समान संधी कक्षाच्या तर्फे लोगो डिझाईनिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा कला शाखेच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय कला शाखेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेत जवळपास 50 विद्यार्थिनींनी आपला कलाविष्कार प्रकट केला. सदर स्पर्धेचे आयोजन समान संधी कक्षाच्या समन्वयक प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते. सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून म. स. गा. महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीष सोनवणे आणि जे ए टी महिला महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ सलमा अब्दुल सत्तार यांनी काम पाहिले. डॉ सोनवणे यांनी विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी आपल्याला उपलब्ध असलेल्या संधींचा योग्य उपयोग करून अर्थार्जन हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवावे असे विचार मांडले. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले.