📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे ओझोन दिन साजरा

ओझोन थराचे रक्षण करणे ही सामुहिक जबाबदारी.” -  प्रा. जे.व्ही.मिसर

रावळगाव: श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगावजि. नाशिक येथे ओझोन दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ हे होते, या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रा. नारायण सोनवणे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून भूगोल विषयाचे विभाग प्रमुख प्रा. जे. व्ही. मिसर सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

  यावेळी प्रमुख वक्ते प्रा. जे. व्ही. मिसर म्हणाले की, सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेण्याचे कार्य ओझोनचा थर करत असतो व त्यात जवळजवळ ९९% किरणे ही ओझोन कडून शोषली जातात, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून पासून रक्षण होते. मात्र अंटाट्रीकावरील ओझोनला पडलेल्या छिद्राने अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले म्हणून १९८५ पासून ओझोन व विषयाकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात झाली आणि १६ सप्टेंबर १९८७ या दिवशी युनोच्या पर्यावरण विभागाने कॅनडा येथे हा मसुदा पहिल्यांदा जगासमोर मांडला गेला. यातूनच जागृत होऊन जगातील सर्वच देशांनी नायट्रिक ऑक्साईड चे प्रमाण ५०% पेक्षा कमी करण्याचा करार केला. म्हणून १६ सप्टेंबर १९९५ पासून पासून हा दिवस जागतिक स्तरावर ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला व  मानव जातीच्या कल्याणासाठी व भविष्यातील पिढ्यासाठी ओझान थराचे रक्षण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रा.जे.व्ही.मिसर यांनी श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील कार्यक्रम प्रसंगी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.नारायण सोनवणे म्हणाले की, पृथ्वी सभोवतालचा ओझोनचा थर जर नष्ट झाला तर भविष्यात मानवाला फार मोठ्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. किंबहुना मानव जातीचे पृथ्वीवरील अस्थित्वच धोक्यात येऊ शकते. मात्र सध्या वाढती लोकसंख्या व त्याला अनुसरुन वाढते ओद्यीगीकरण, नागरीकरण  प्रदूषण व विजेचा भरमसाठ वापर या सर्वाचा विपरीत परिणाम ओझोनवर होऊन त्याला दिवसेदिवस छिद्रे निर्माण होत आहेत. या सर्व गोष्टीवर योग्य वेळी आळा घातला नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.

यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ओझोनच्या संरक्षणासाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी वातानुकुलीत यंत्रे, सुगंधी रसायने, तसेच विविध प्रकारचे रासायनिक केमिकल्स, बर्फ निर्माती, यासारख्या गोष्टीवर नियत्रण ठेऊन
ठेऊन होणारे ओझोन क्षय थांबवले जाऊ शकते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेन्द्र पगार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागातील प्रा.एन.आर शेवाळे यांनी केले. त्यात त्यांनी ओझोन थर व तो संरक्षित करण्याच्या फायद्या विषयी सविस्तर अशी माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा गेंद या विद्यार्थ्याने केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. प्रा. एस. टी. आंबेकर, प्रा.जे.के.अहिरे, प्रा. पूनम गवळी, प्रा. मोहिनी निकम प्रा. विजय पगार, प्रा. मयुरी निकम, प्रा. सारिका सोनवणे यांच्या सह  कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण बच्छाव , यांच्या सह महाविद्यालयीन कर्मचारी महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, डी.सी. पाटील, प्रवीण देवरे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार, महेश बच्छाव, सचिन भदाणे इत्यादी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने