मालेगाव (जय योगेश पगारे) विविध विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणणे काळाची गरज असून यात लाच मागून आपल्या विभागाचे नाव व त्याची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या कारवाईत तक्रारदारांना न्याय देण्याचे काम एसीबी करत असते,
या प्रकरणातील तक्रारदार यांचेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न करणेसाठी व पुढील कारवाईत मदत करण्यासाठी किल्ला पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस नाईकाने तक्रारदार यांचेकडे तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (दि.७) पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपीने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारली असता पो.ना. तानाजी मोहन कापसे ( किल्ला पोलीस स्टेशन) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत रंगेहात पकडले आहे व त्याच्या विरुद्ध मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे अधिक्षक श्री. सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव , पोहवा. प्रफुल्ल माळी, पोना. प्रवीण महाजन, पोना. प्रणय इंगळे, पोना. संदीप बत्तीसे, चापोना परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. टोल फ्रि क्रं. १०६४