📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

बैल चोरून नेणारे चोरटे जेरबंद; कॅम्प पोलिसांची धडक कारवाई

मालेगाव शहरातील मार्केट यार्ड परिसरातील दावणीला बांधलेले बैल चोरून नेणाऱ्या चोरट्यांना कॅम्प पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे.

मोहम्मद सलीम मोहम्मद यांनी कॅम्प पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या मालकीचे तीन बैल व एक गोऱ्हा मार्केट यार्ड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार नोंदवली होती; त्यानुसार कॅम्प पोलिसांनी तपासाची चक्रे फिरत आरोपींना अटक केली आहे व त्यांच्या ताब्यातील तीन बैल व एक गोऱ्हा हस्तगत केले आह.
कॅम्प पोलिसांच्या या कारवाईत शाहबज खान आरिफ खान, मोहम्मद एकलाख मोहम्मद शरीफ, मयूर शाह कलीम शाह, शेख इकबाल शेख रहीम, सलीम मोहम्मद शरीफ, सय्यद वसीम सय्यद सलीम या आरोपींना अटक करण्यात आली आहे
हे कामगिरी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप कुमार जाधव, कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. योगेश पवार व पोलीस कॉन्स्टेबल सिकंदर कोळी यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने