📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ए. बी. जाजू विद्यालयातील मुष्टीयोध्यांच्या पाठीवर कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे यांची कौतुकाची थाप

दिनांक 19 20 व 21 ऑगस्ट रोजी ऋषिकुल विद्यापीठ सोनीपत हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ग्रापलिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ए. बी. जाजू विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री प्रशांत आढाव व विद्यार्थी हितेश फंगाल व कांस्यपदक विजेते गौरव चित्ता व रितेश अहिरे यांनी फक्त मालेगावचेच नाही तर अखंड महाराष्ट्राचे नाव देशात किर्ती रुपाला आणले आहे यांची कीर्ती दिवसेंदिवस सर्वदूर पसरत आहे व परिसरातील सरकारी निमसरकारी संस्था व लोक सर्व पुरस्कार प्राप्तांचा सन्मान करून त्यांना शाबासकी देत आहेत

ए बी जाजू शाळेने सुद्धा आपल्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्याची संधी न दवडता त्यांचा आज छोटे खाणी सत्कार केला प्रसंगी कार्यक्रमाला स्वत: मंत्री  दादाजी भुसे  प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली त्यांनी स्वतः पुरस्कार प्राप्त शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार केला तर तेवढेच न करता भविष्यात त्यांना ज्या काही मदती लागतील त्या सर्व करण्याचे आश्वासन सुद्धा दिले प्रसंगी श्रीमान प्रशांत आढाव व हितेश फंगल यांची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रापलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर त्यासाठीही आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले 

प्रसंगी त्यांनी संस्था शाळा शिक्षक वृंद व्यवस्थापकीय मंडळ सगळ्यांचेच कौतुक करून त्यांना एक प्रेरणा रुपी आशीर्वाद दिला कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष श्रीमान राजेशजी जाखोट्या ,व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य कल्पेशजी हेडा समीरजी मुंदडा ,राजकुमारजी मुंदडा राधेश्यामजी काला व शिवसेनेचे मालेगावाचे पदाधिकारी व पालक यांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची ठरली

प्रसंगी ग्रॅपलिंग हा कुस्तीचा नेमका कोणता प्रकार आहे याच्या छोटासा नमुना म्हणून शाळेतील क्रीडाशिक्षक व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी यांनी ग्रॅपलिंगचा एक नमुना दाखल प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ललिता हिरे यांनी केले तर शाळेच्या उपमुख्याध्यापिका झेनब रस्सीवाला यांनी उपस्थित व मान्यवरांना आभार प्रदर्शित केले. रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ, मुख्याध्यापिका स्मिता ठाकरे, उपमुख्याध्यापिका , शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मुलांना व व क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने