📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

भारताचा पाकड्यांवर दणदणीत विजय

दुबई (उमेश वाघ)  दुबई इंटरनॅॅशनल स्टेडियमवर आज आशिया चषक २०२२ चा क्रिकेटचा हायव्होल्टेज  सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. (India Pakistan match)   
मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यानंतर प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते, (india win cricket match)
आज भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाला जेरीस आणले होते व त्यांच्यावर 5 गडी व 2 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला 

पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 147 धावा करून सर्वबाद झाला.
 शानदार गोलंदाजी भारताच्या विजयाचे कारण ठरली. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही. पाकिस्तानला केवळ 147 धावा करता आल्या. सर्व 10 बळी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतले.

पाकिस्तानच्या संघाकडून सलामीला मोहमद रिजवान व बाबर आजम फलंदाजीस आले. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंघने बाबर आजमला झेलबाद करत अवघ्या १० धावांवर तंबूत पाठविले. पहील्या पाच षटकांंत ३० धावांवर एक गडी बाद अशी स्थिती पाकिस्तानच्या संघाची होती.

बाबर आजम नंतर फखर जमान फलंदाजीसाठी मैदानात आला .सहाव्या षटकात आवेशखानच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने फखर जमानला झेल बाद केले. फखर जमानने १० धावा केल्या. फखर जमान नंतर इफ्तिकार अहमद फलंदाजीस मैदानात आला. १० षटकात ६८ धावांवर २ गडी बाद अशी स्थिती पाकिस्तानच्या संघाची होती. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने इफ्तिकार अहमदला २८ धावांवर झेल बाद केले.सलामीला आलेल्या मोहमद रिजवानने ४२ चेंडूत ४३ धावा केल्या.आवेश खानने मोहमद रिजवानला झेल बाद केले. रवींद्र जडेजा ने आक्रमक खेळी करत २९ चेंडूत ३५ धावा केल्या.मोहमद नवाजने जडेजाला क्लीन बोल्ड केले.

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाने खुशदील शाहला अवघ्या २ धावांवर झेलबाद करत माघारी पाठविले. पाठोपाठ सूर्यकुमार यादवने असिफ अलीला नऊ धावांवर झेलबाद केले. मोहमद नवाज अवघ्या १ धाव संख्येवर झेल बाद होत माघारी परतला.पाठोपाठ भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शादाब खान १० धावांवर पायचीत झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर नसीम शहा पायचीत होत शून्यावर बाद झाला. अर्शदीप सिंघ ने शाहनवाझ दहानीला १० धावांवर क्लीन बोल्ड केले.पाकिस्तानच्या संघाने ९ गडी बाद १४७ धावा केल्या.
Pakistan cricket team India Pakistan match

भारतीय संघाने १४८ धावांचे लक्ष पार करताना सलामीला कर्णधार रोहित शर्मा व के एल राहुल फलंदाजीस आले.पहिल्या षटकातच नसीम शाहने के एल राहुलला शून्यावर क्लीन बोल्ड केले. रोहित शर्माने १८ चेंडूत १२ धावा करत इफ्तिकार अहमद कडून झेल बाद झाला. विराट कोहलीने शानदार खेळी करत ३४ चेंडूत ३ चौकार व एक षटकार लगावत एकून ३५ धावा केल्या.मोहमद नवाजच्या गोलंदाजीवर इफ्तिकार अहमदने विराट कोहलीला झेल बाद केले. १० षटकात ३ गडी बाद ६३ धावा अशी धाव संख्या भारतीय संघाची होती. नसीम खानच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव १८ धावांवर बाद झाला.
Last sixer by Hardik pandya
हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ३३ धावा करत विजयी षटकार लगावत पाकिस्तानवर विजय मिळविला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने