📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

वासोळसह परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा

प्रतिनिधी प्रशांत गिरासे वासोळ

शेतकऱ्यांचा खरा साथी सोबती वेळप्रसंगी जीवाला जीव देणारा स्वतः काबाडकष्ट मेहनत करून दुसऱ्याला जगवणारा जगाचा पोशिंदा म्हणून दरवर्षी पोळा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बैलाने केलेल्या कामाचे ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला पोळा हा सण सर्वत्र साजरा करतात. पोळा सणाच्या अगोदर दोन दिवसापासून बैलांना कोणत्याही प्रकारची कामे लावत नाहीत. स्वच्छ करण्यासाठी आंघोळ घालतात खांद्याला तेल लावतात . बैलांच्या शिंगाना वेगवेगळ्या प्रकारची  रंग लावतात अंगावर झुली पांघरून गोंडे लावतात गळ्यात घुंगराच्या माळा घालून वेगवेगळ्या पद्धतीने बैलांना सजवण्यात येते.
   बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यानां आरती ओवाळतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. बळीराजा आणि नंदीराजा या दोन मित्राचा ऋणानूबंधाचा सण म्हणजे पोळा होय. पुरण- पोळी, हरभऱ्याची (कनीची) भाजी असे पारंपरिक जेवण घरोघरी केलेले असते. जन्मभर मालकासाठी राब राब राबणारा व मेहनत करणाऱ्या बैल मालकाला आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रिय असल्याने तो त्याला जीवापाड जपत असतो बैलाने केलेल्या कामाचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने