आज आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बुधा बागुल.वय ५० वर्षे या लाचखोर अधिकाऱ्याला आज तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे,
गेल्या आठ दिवसांपासून बागुल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पाळत ठेवून होता, आज तो मुंबईहून परत आल्यावर एका कॉन्ट्रॅक्टर सोबत तो लाच घेत असताना त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
नाशिक जिल्ह्यातील हरसुल येथील मुला-मुलींचे वस्तीगृहातील सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी लागणारा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात कामाच्या एकूण दोन कोटी चाळीस लाख रुपये रकमेच्या 12% प्रमाणे 28 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आज दिनांक 25 / 8 /2022 रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले
ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने तसेच श्री. नारायण न्याहळदे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक, वाचक, यांचे मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी अनिल बागुल, पोलीस निरीक्षक ,ला.प्र.वि.,नाशिक यांच्यासोबत
पो. ना. किरण अहिरराव, पो.ना.अजय गरुड,
पो.ना.नितीन कराड, पोहवा.संतोष गांगुर्डे, पो.ना.मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली