📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नाशिक | राकेश आहेर
भारतात भ्रष्टाचार करणाऱ्यांची संख्या कमी नाही गलेलठ्ठ  सरकारी पगार घेऊन सुद्धा या भुकेल्यांचे भूक भागत नाही अश्याच एका आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला वीस हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे

सेवानिवृत्ती नंतरचे रजा रोखीकरणाचे बील मंजूर करण्यासाठी वीस हजारांची लाच मागणाऱ्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत अटक केली.

 श्री.गजानन मारोतराव लांजेराव या लाचखोर अधिकाऱ्यास त्याच्याच दालनात वीस हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात येऊन त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,
पोलीस उपअधिक्षक वाचक सतीश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार,अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रफ्फूल माळी, प्रणय इंगळे, नितीन कराड, विनोद पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने