मुंबई (प्रमोद पवार | मंत्रालय प्रतिनिधि) महाराष्ट्रातील अनेक तरुणांची स्वप्न असलेल्या तसेच सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच ७ हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
राज्यातील गृह विभागात लवकरच ७ हजार पोलिसांची भरती संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी भरती संदर्भात माहिती दिली. तसेच आणखी ७ हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.