📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ए. बी. जाजू शाळेत श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला बाळराधाकृष्णसोबत मोठ्या उत्साहात साजरा

अटकेपार बहुश्रुत असलेला कृष्ण रचित भागवत धर्माला आज  कुठल्याही ओळखीची गरज नाही संपूर्ण जग आज कृष्णमय झाले आहे अशा या कृष्णाच्या जन्मउत्सव जाजू विद्यालयात नुकताच संपन्न झाला प्रसंगी बालगोपाळांच्या रूपात साक्षात राधाकृष्ण विद्यालयात अवतरल्याचा भास झाला. बालगोपाळांचा उत्साह व रूप अगदी भगवंताचे दर्शन परिसराला घडवत होते त्यात भर म्हणून शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सजावटी द्वारे गोकुळच  साकारले होते म्हणून वातावरण अगदीच कृष्णमय झाले. जाजू  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता ठाकरे यांच्या शाळेत होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांना नुसता हातभार नव्हे तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना सक्रिय पुढाकार सुद्धा असतो त्या अनुषंगाने त्यांनी प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षिका वृंदाला योग्य त्या सूचना देऊन कार्यक्रमाचे सुरेख आरेखन व बांधणी करून नयनरम्य असा अनुभव विद्यार्थी व पालक यांना करून दिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने