*नाशिक*: चांगल्या गोष्टींची सुरूवात करण्यासाठी एक पाऊल उचलणे आवश्यक आहे. गुरूजण,आई-वडील आणि समाजातील प्रत्येक घटका बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत नवीन संस्थांची उभारणी होणे आवश्यक आहे. मविप्र ही लोकशाही मार्गाने पुढे जाणारी नाशिक जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. रावसाहेब थोरात यांना अभिप्रेत असलेला समाज हा जातीपातीत अडकून राहिलेला किंवा नातेवाईकांचा वशीला लावणारा समाज नसून १२ बलुतेदार व शेतीवर जगणारा ज्ञानाने विकसित सर्व जातीधर्मातील समाज होय. बागलाण तालुक्यात सर्वाधिक शिक्षित मुली आहेत. भारत माता म्हणजे घराघरातील याच मुली होत, मुलींनी व्यक्त झाले पाहिजे. 'एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...' असे म्हणत युवक आणि युवतींनी एक-एक पाऊल राष्ट्रोन्नतीसाठी पुढे टाकले पाहिजे व कर्मवीरांप्रमाणे नवीन संस्थांची निर्मिती केली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशीर हिरे यांनी केले. मविप्रच्या समाज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
*मविप्र हे विदयापीठ होईल*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर कदम म्हणाले की मविप्र हे लवकरच विदयापीठ होईल जेथे सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे तळागाळातील शेतकरी बांधवांच्या मुलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न होईल. मुली शेतीचे शिक्षण घेत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
*राष्ट्र उभारणीसाठी सटाणा कॉलेजचे भरीव योगदान*
सटाणा महाविद्यालय हे मविप्रचे पहिले महाविद्यालय असून २२ एकर जागेतील २० इमारतींमध्ये विविध शिक्षण वीद्याशाखांचे अद्यापन करीत आहे. राष्ट्रउभारणीत महाविद्यालयाचे योगदान मोलाचे आहे असे प्राचार्य डॉ. कृष्णा गायकवाड यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगत प्रास्ताविकात म्हणाले.
पल्लवी मोरे, निकीता मांडवडे या विद्यार्थिनींचा, प्रा नितीन पंडीत, प्रा महेश वाघ, प्रा तृप्ती काकुळते, प्रा सोनाली देवरे, प्रा. एफ वाय भोळे, प्रा. प्रशांत कोळी, प्रा करन गायकवाड तसेच शेतक्र्यांसाठी बनविलेल्या नाविन्यपुर्ण उपकरणास भारत सरकारने वैयक्तिक पेटंट ग्रांट केले आहे असे प्रा. किरणकुमार जोहरे यांना समाजदिना निमित्त गौरविण्यात आले.
संगीत विभागाच्या प्रा सोनाली गोसावी व समुहाने समाजगीत सादर केले. दिशा जाधव व ऐश्वर्या जाधव तसेच प्रा. पंकजकुमार गांगुर्डे यांनी समाजधुरींबद्दल माहिती दिली. परीचय डॉ. सुनिल सौंदाणकर यांनी, सुत्रसंचालन प्रा. सुनिता शेवाळे यांनी केले तर आभार डॉ. साहेबराव कांबळे यांनी मानले.