📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

घर भाडे भत्ता वाढवण्यासाठी लाचेची मागणी; मुख्याध्यापकासह उपशिक्षिकेला रंगेहात पकडले

मालेगाव-  मालेगाव महानगरपालिका हद्दवाढी मध्ये समावेश झालेल्या सोयगाव मधील शाळेचा महापालिका हद्दीत समावेश झाल्याने घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी शिपायाकडून लाच मागणाऱ्या मुख्याध्यापक व उपशिक्षिकेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहात पकडले आहे

सोयगाव नववसाहत येथे असणाऱ्या सर्वोदय शिक्षक संस्था संचलित जागृती माध्यमिक विद्यालय, या शाळेचा महापालिका हद्दीत समावेश झाला, त्यामुळे शहरी भागात गेल्यामुळे वेतन नियमानुसार घर भाडे भत्ता मिळतो
 तक्रारदार महिला या शाळेत शिपाई पदावर कार्यरत असतांना त्यांच्या पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल प्रकाश मोरनकर  यांनी शिपाई महिलेकडून १३५० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार महिलेने  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली, त्यामुळे मुख्याधापक मोरणकर यांच्या सांगण्यावरून उपशिक्षिका मनीषा सुदाम चव्हाण (४७) यांनी मुख्याध्यापक दालनात फिर्यादी महिलेकडून १२५० रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक साधना भोये - बेलगावकर,हवालदार सचिन गोसावी,चंद्रशेखर मोरे यांनी केली. याप्रकरणी मुख्याध्यापक मोरनकर व उपशिक्षिका मनीषा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक साधना भोये - बेलगावकर करीत आहेत

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.
@ टोल फ्रि क्रं. 1064



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने