नासिक प्रतिनिधी
आज दिनांक 29/8/2022 रोजी आपले गुरूजी अभियान अंतर्गत शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्यास नासिक जिल्हा शिक्षक भारतीने प्रखर विरोध केला असून त्यासंबधीचे निवेदन शिक्षक भारतीने शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसांचालक तसेच जिल्हाधिकार्याना देऊन संताप व्यक्त करीत शिक्षणाधिकारी कार्यालय नासिक येथे निदर्शने केली. तसेच विधान सभेत आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांसंदर्भात केलेल्या चुकिच्या विधानाचाहि निषेध व्यक्त करण्यासाठी शिक्षक भारतीने नाशिक जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी माध्यमिक अधीक्षक सुधीर पगार, प्राथमिक शिक्षणााधिकारी प्रभारी कनोज व यांना निवेदन दिले.
याप्रसंगी शिक्षक भारतिचे राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभगिय् अध्यक्ष राजेंद्र लोंढे, राज्य समन्वयक के के अहिरे,जिल्हाध्यक्ष साहेबराव कुटे, प्रकल्प पाटील, दिलिप धांडे,संजय मगर, प्रकाश भदाणे,संग्राम करंजकर, एन एन खैरनार, संजय पाटील, शंकर सांगळे , सचिन सुर्यवंशी, शुभांगी पवार, बाळासाहेब मोरे, राजेंद्र गिते, गोरख कुनगर, आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.