📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल ची सरशी - नितीन ठाकरे नवीन सरचिटणीस.

कुकाणे (दिनेश पगारे)राज्यातील दोन नंबरची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकांचे कल स्पष्ट झालेत. दिग्गजांना धक्का देत परिवर्तन पॅनलची सरशी बघायला मिळाली. इतकेच नाही तर सरचिटणीस नीलिमा पवार यांचाही या निवडणूकीमध्ये मोठा पराभव झालायं. नीलिमा पवार यांचा पराभव नितीन ठाकरे यांनी केलायं. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूकांमध्ये दिग्गजांना धक्का बसलायं..
या निवडणूकीमध्ये सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले यांचा विजय झालायं. आमदार माणिकराव कोकाटे यांचा पराभव करत सुनील ढिकले यांचा विजय झाला. ढिकले हे भाजप आमदार राहुल ढिकले यांचे बंधू आहेत. यामुळे भाजपाचा ढिकले यांना या निवडणूकीमध्ये सपोर्ट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सरचिटणीस नीलिमा पवार यांचा दारून पराभव या निवडणूकीमध्ये झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जातंय

तालुका संचालकपदी विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, इगतपुरी- संदीप गुळवे (५,२६२), भाऊसाहेब खताळे (४,२६१), कळवण- रवींद्र देवरे (५,१२६), धनंजय पवार (४,४०५), चांदवड- डॉ. सयाजी गायकवाड (५,१३७), उत्तम बाबा भालेराव (४,४४१), दिंडोरी व पेठ- प्रवीण जाधव (५,४८५), सुरेश कळमकर (४,०७२), नाशिक शहर- लक्ष्मण लांडगे (५,०२३), नाना महाले (४,५३१), निफाड- शिवाजी गडाख (५,२५१), दत्ता गडाख (४,२७८), नांदगाव- अमित पाटील (५,०१८), चेतन पाटील (४,५५१), बागलाण- डॉ. प्रसाद सोनवणे (४,९७९), विशाल सोनवणे (४,५३५), मालेगाव- रमेश बच्‍छाव (५,०६६), डॉ. जयंत पवार (४,५२८), येवला- नंदकुमार बनकर (५,२६०), माणिकराव शिंदे (४,३३४), सिन्नर- कृष्णाजी भगत (५,१७९), हेमंत वाजे (४,२६१), देवळा- विजय पगार (४,८८५), केदा आहेर (४,६५२), नाशिक ग्रामीण- रमेश पिंगळे (४,९९५), सचिन पिंगळे (४,६०४)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने