📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

विवाहितेच्या छळ प्रकरणातील दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी; लाचखोर हेड कॉन्स्टेबलला रंगेहात अटक.

चाळीसगाव (जय योगेश पगारे) भ्रष्टाचाराची कीड प्रत्येक क्षेत्रात असली तरी शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही कीड मोठ्या प्रमाणात आढळत असते
गलेलठ्ठ पगार, शासकीय सुखसोयी उपभोगूनसुद्धा या लाचखोर अधिकाऱ्यांची भूक भागत नाही, बकासुराप्रमाणे सगळीकडे त्यांना फक्त 'पैसे' खाणेच दिसते.
चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या बहिणीच्या सासरच्या मंडळीं विरोधात दाखल केलेल्या फिर्यादीच्या प्रगतीबाबत विचारणा केले असता आरोपी लाचखोर पो.हे.काँ. दीपक ठाकूर याने सदर प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली, त्यामुळे तक्रारदार यांनी  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली.
त्यानुसार  धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व आरोपी दीपक ठाकूर याने तक्रारदार यांच्या कडून तीन हजार रुपयांची लाच पोलीस ठाण्यातच पंचासमक्ष स्वीकारली, धुळे ला. प्र. वि. ने सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
त्यानुसार पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी
सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. अनिल बडगुजर ,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे.
सापळा अधिकारी- श्री प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक ला.प्र. वि.धुळे, सहा.सापळा अधिकारी- श्री.मंजितसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे
यांच्या सोबत  राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, 
भूषण खलाणेकर, भूषण शेटे,संदीप कदम ,संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रविण पाटील,मपोशी गायत्री पाटील,वनश्री बोरसे, रोहिणी पवार, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या सापळा पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने